सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार, ५० लाख कुटुंबांना लाभ
राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत
नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार,४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपाचे आमदार गोपीचंद …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी; मोफत वाळू वितरणाचीही हमी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर
राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर करत केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सद्यस्थितीत सकाळी ६ …
Read More »भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोजणीदारांचे काम बंद आंदोलन मागे
राज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूमी अभिलेख विभागातील मोजणीदारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजणीदार संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत …
Read More »शासनाचा नवीन निर्णयः शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मिळणार नव्या शासन निर्णयानुसार एकदाच मिळणार पण कमी
महाराष्ट्र सरकारच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबतच्या नवीन आदेशात पूर्वीच्या तुलनेत कमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शुक्रवारी एक नवीन सरकारी निर्णय (जीआर) जारी केला ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत भरपाईसाठी पात्रता आणि प्रति हेक्टर अतिरिक्त आर्थिक मदत या निकषांवर जानेवारी २०२४ चा पूर्वीचा आदेश रद्द करण्यात …
Read More »शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, आता इतक्या कमी पैशात करा जमीनीची हिस्से वाटणी ट्विट करत निर्णयाची दिली माहिती
ग्रामीण भागात शेतजमिनी हिस्से वाटणी ही भूमी अभिलेख आणि शेतकऱ्यांसाठी डोकेदुकी असते. तसेच भाविकीतील किंवा एकाच कुटुंबातील हिस्सेवाटप आदी प्रश्नी शेतकऱ्यांचे हजारो पैसे वाया जात असल्याचे आणि त्याचे पर्यावसन वादात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतीची हिस्से वाटप मोजणी आता अवघ्या २०० रूपयात करण्याचा निर्णय घेत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचिती भाजपाकडून खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन
ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ऑपरेशन सिंदूर …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री नोंदणी थांबवा कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेत घेण्याच्या सूचना
राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. या देवस्थान जमीनींचे खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत. देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकार धोरण ठरवित आहे. तोपर्यंत या जमिनींची दस्त नोंदणी करणे थांबविण्यात यावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्याबरोबरच कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेमध्ये बसवून सर्व्हे करण्यात यावा, असेही …
Read More »
Marathi e-Batmya