आनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

साधारणत: मान्सून केरळात कधी दाखल होणार याचा अंदाज १५ मे नंतर व्यक्त करण्यात येतो. मात्र यंदाच्यावर्षी मान्सूनचे आगमन १ जूनला केरळात होणार असल्याचा अंदाज यावेळी अगोदरच वर्तविण्यात येत असल्याचे हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांनी वर्तविला आहे.

मान्सून केरळात वेळेवर दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातही ७ जूनला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

तसेच महाराष्ट्रासह दक्षिण भारतात १५ मे ३१ मे पर्यंत अवकाळी पाऊसाचा अंदाज असून १ जून रोजी मात्र मान्सूनचे आगमन केरळात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात राजीवन माधवन यांनी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला असून तशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

About Editor

Check Also

१० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *