काँग्रेस करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन ‘आरे वाचवा’साठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर उद्या आंदोलन !: समीर वर्तक

मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या रविवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शांततेत निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी दिली आहे.

मुंबई शहराच्या मध्यभागी मुंबईकरांना ऑक्सीजनचा पुरवठा करणारे पर्यावरणाचे महत्व जपणारे, जैवविविधतेने नटलेले आरचे जंगल आहे. जगात नैसर्गिक जंगल असलेले मुंबई हे एकमेव शहर आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली. दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हज़ारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले होते. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराज आहे.

पर्यावरण व हवामान ढासळत असताना अश्या तुघलकी निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात रविवारी आंदोलन करून निषेध व्यक्त केला जाणार आहे. या आंदोलनात सर्व पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा, पर्यावरण वाचवा’ या आंदोलनात सहभागी व्हावे होऊन आरेचे जंगल वाचवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहनही समीर वर्तक यांनी केले आहे.

About Editor

Check Also

जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने; अचूकतेसह राष्ट्रीय मानकांचे पालन व्हावे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण

जनगणना हा विकास नियोजनाचा भक्कम पाया आहे. जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने होणार असून ती अचूक, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *