मुंबई सहनिबंधक कार्यालयातील या पदांसाठी उद्यापासून अर्ज भरा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ७ जुलै पासून सुरू होणार

मुंबई विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) या कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकार अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपीक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा परिक्षेकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज ७ जुलै २०२३ पासून करता येणार आहेत.

या भरती प्रक्रियेबाबतच्या सविस्तर तपशिलासह जाहिरात सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.७ जुलै २०२३ रोजी पासून उपलब्ध करण्यात येत आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. ७ जुलै २०२३ (दुपारी १२.०० वा. पासून) ते २१ जुलै २०२३ रोजी (रात्री २३.५९ वा. पर्यंत) या कालावधीत करता येतील, असे मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

About Editor

Check Also

ठाणेकरांनी पुढील ७ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे येवई महासंतुलक जलाशयाच्या दुरुस्तीनंतर जलगुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता

बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर येथील जलप्रणालीअंतर्गत येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *