परकीय चलनाच्या साठा पुन्हा वाढला १.१५ अब्ज डॉलरची पडली भर

देशाच्या परकीय चलनाचा साठा १३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.१५ अब्ज डॉलरने वाढून ५८५.८९ अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. याआधी अनेक आठवडे परकीय चलनाचा साठा कमी होत होता. मागील आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलन साठा २.१७ अब्ज डॉलरने घसरून ५८४.७४ अब्ज डॉलर झाला होता.

भारताच्या परकीय चलनाचा साठा ऑक्टोबर २०२१ मध्ये ६४५ अब्ज डॉलर इतका उच्चांक गाठला. परंतु गेल्या वर्षीच्या जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावादरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपयाच्या मूल्यातील घसरण थांबवण्यासाठी परकीय चलनाचा साठा वापरला. त्यामुळे तो कमी झाला.

या वर्षी १४ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्याने पुन्हा एकदा ६०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्या आठवड्यात साठा १२.७४ अब्ज डॉलरने वाढून ६०९.०२ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन संपत्ती १७८ दशलक्ष डॉलरने घसरून ५१९.३५ अब्ज डॉलर झाली आहे. परकीय चलन मालमत्ता परकीय चलन साठ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या परकीय चलन मालमत्तेमध्ये युरो, पौंड आणि येन यांसारख्या बिगर यूएस चलनांमधील चढउतारांचे परिणाम देखील समाविष्ट असतात.

दरम्यान, देशातील सोन्याचा साठा १.२७ अब्ज डॉलरने वाढून ४३.५७ अब्ज डॉलर झाला आहे. आकडेवारीनुसार, स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDRs) ७२ दशलक्ष डॉलरने वाढून १७.९९ अब्ज डॉलर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे ठेवलेला देशाचा चलन साठा ८ दशलक्ष डॉलरने कमी होऊन ४.९७ अब्ज डॉलरवर आला आहे.

About Editor

Check Also

विप्रोच्या एआयमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली नोकर भरती आणि सॉफ्टवेअर विकास आणि कराराचे स्वरूप बदलतोय

विप्रोच्या एआय (AI) उपक्रमांमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली आहे, ज्यांना नंतर भारतीय आयटी फर्ममध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *