बादशाह मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट ? शिल्पा शेट्टीच्या पार्टीत बादशहा दिसला या मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत रॅपर बादशाहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत बादशहा एका अभिनेत्रीचा हात पकडून दिवाळी पार्टीतून बाहेर जाताना दिसत आहे.रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने वेगळाच तर्क काढला आहे. बादशहासोबत दिसणारी ही अभिनेत्री मृणाल ठाकूर असून ती आणि बादशाह डेट करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटल आहे

रेडिटवर एका युजरने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, मृणाल आणि बादशाह शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत गेलेत. ते दोघं डेट करत आहेत का? युजर्सच्या या प्रश्नावर अनेकांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. मृणाल ठाकूर आणि बादशाह हातात हात घालून शिल्पाच्या पार्टीतून बाहेर जाताना दिसत होते. एकाच कारमधून ते पार्टीसाठी आले होते.

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत मृणालने हिरव्या रंगाचा लेंहगा परिधान केला होता. तर, बादशाह काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये पार्टीत सहभागी झाला होता. पार्टीतून बाहेर पडताना मृणाल ठाकूर पुढे होती तर तिच्या मागे बादशाह येताना दिसत होता. पार्टीतील काही फोटोही मृणालने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. स्टोरीवर तिने बादशाहसोबत फोटो पोस्ट केले आहे. तर, शिल्पा शेट्टीसोबतही त्यांनी अनेक फोटो पोस्ट केले होते.

एका रेडिट युजरने म्हटलं आहे की, मला त्यांच्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती. बादशाहाचं पहिलं लग्न जॅस्मिन मसीह यांच्यासोबत झालं होतं आणि 2020मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना जेसी ग्रेस मसीह सिंह नावाची एक मुलगी असून तिचा जन्म २०१७मध्ये झाला होता. त्यावरुनच एकाने कमेंट केली आहे की, त्याचे लग्न झालं असून त्याला एक मुलगादेखील आहे. आता यावर मृणाल ठाकूर काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

About Marathi E Batmya

Check Also

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *