अजित पवार यांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी कुटुंबियांची माफी मागितली सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांच्यावरच बुमरँग

साधारणतः दहा वर्षापूर्वी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणावरून चांगलेच वादळ निर्माण झाले होते. तसेच त्यावेळी अजित पवार यांच्या चौकशीचे प्रकरणही खुप गाजले होते. या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावरून अजित पवार यांना राजीनामाही द्यावा लागला होता. या दरम्यानच्या काळात तेव्हांचे आघाडी सरकारमधील गृहमंत्री आर आर पाटील यांचा मृत्यूही झाला. तसेच या कालावधीत तीन वेगवेगळी सरकारही आले. मात्र अजित पवार यांनी यासंदर्भात कोणतीच वाच्यता केली नाही. परंतु सांगलीतील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अजित पवार य़ांनी सिंचन घोटाळ्याचे प्रकरण बाहेर काढत चौकशीचे प्रकरणाचे खापर आर आर पाटील यांच्यावर फोडले. त्यावरून अजित पवार हे चांगलेच अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अजित पवार यांनी सिंचन घोटाळा चौकशीप्रकरणी आर आर पाटील यांचे नाव घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सिंचन घोटाळ्या प्रकऱणी आर आर पाटील यांचे नाव आता घेण्याचे काहीच कारण नव्हते. कारण अजित पवार यांच्यावर सिचन घोटाळ्याचे आरोप हे भाजपाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. वास्तविक पाहता त्यासंदर्भात अजित पवार यांनी त्यांच्या मित्र पक्षांनाच यासंदर्भात जाब विचारायला हवा होता असे सांगत या आरोपानंतर मी आर आर पाटील पाटील यांच्या कुटुंबियांची माफी वैयक्तिक माफी मागितल्याचे स्पष्ट केले.

यावेळी अजित पवार यांनी मोकळ्या चौकशीसाठीच्या फाईलीवर आर आर पाटील यांनी सही केल्याची फाईल त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला दाखविली होती अशी माहिती अजित पवार यांनीच जाहिर सभेत बोलताना दिली. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेले देवेंद्र फडणवीस जर अजित पवार यांना बोलावून फाईल दाखवित असतील तर हा गोपीनियतेचा भंग आहे. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीकडून गोपनीयतेचा भंग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणून त्यांना आपलंस करत असतील तर हे दुर्दैवी असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, आर आर पाटील हे गेल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आणि मतदारसंघाची जबाबदारी पूर्णपणे पवार कुटुंबियांनी घेतली होती. त्याचबरोबर आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना उमेदवारी देणं त्यांना निवडूण आणणं आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने पार पाडली. त्यातच आता आर आर पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी तासगांव कवठे महांकाळ येथून दिली आहे. या सगळ्या घडामोडीत कधी काळी आर आर पाटील यांच्या कुटुंबियाची राजकिय काळजी घेण्यासाठी पुढाकार घेणारे अजित पवार आता आर आर पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने अजित पवार यांच्या राजकिय भूमिकेविषयी संशय निर्माण करण्यात येत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *