नितीन गडकरी म्हणाले, राहुल गांधी यांना कोणी गांभीर्याने घेत नाही पंतप्रधान मोदी-बायडनच्या तुलनेवर नितीन गडकरी यांचे वक्तव्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱे वक्तव्य केले. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही तुलनाच चुकीची असून लोकांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नितीन गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्मरणशक्ती कमी झाल्याच्या गांधींच्या आरोपांवर संशय व्यक्त केला आणि त्यांची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी केली. “राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलतात, त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही.. मला वाटते की लोकांनी त्यांची मत गांभीर्याने घेऊ नये, असेही यावेळी सांगत राहुल गांधी यांचे ते वक्तव्य “बेजबाबदार” पणाचे असल्याची टीका केली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीसमोरील आव्हानांबद्दल विचारले असता, नितीन गडकरींनी मान्य केले की विरोधकांच्या कथनांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. “आम्ही ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या, असे आख्यान तयार केले गेले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानात सुधारणा करू,” असे सांगून ते म्हणाले की, संविधानात बदल करण्याचा भाजपचा कोणताही हेतू नाही. “आम्ही ते करणार नाही आणि इतरांना करू देणार नसल्याचे सांगितले.

‘बटेंगे तो काटेंगे’ या घोषणेसह पक्षाच्या सदस्यांच्या वादग्रस्त टिप्पण्यांदरम्यान भाजपाच्या विकासाबाबतच्या बांधिलकीबद्दलच्या चिंतेबद्दल बोलताना, नितीन गडकरी यांनी पक्ष विकासाच्या व्यासपीठावर निवडणुका लढवत असल्याचे सांगितले.

नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, “आपण सर्व एक आहोत. कोणी मंदिरात, कोणी मशीद, गुरुद्वारा, चर्चमध्ये जातात. पण आपण सर्व भारतीय आहोत आणि देश आपल्यासाठी सर्वांपेक्षा वरचा आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधानंतर, महायुतीमधील वाढत्या गटबाजीवर, बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, युतीमध्ये भिन्न मतांसह भिन्न पक्ष आहेत. दहशतवाद आणि नक्षलवादाच्या विरोधात एकजुटीचे आवाहन यावेळी केले.

जातीच्या जनगणनेवर राहुल गांधी यांच्या मागणीवर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की. खरे मुद्दे म्हणजे गावे, गरीब आणि शेतकरी यांचे कल्याण आहे. “गरीबांना जात आणि धर्म नसतो. मुस्लिमांना इतरांप्रमाणेच पेट्रोल मिळते, असे सांगत मी यापूर्वी भाजपा अध्यक्ष होतो आणि आता त्या पदाची इच्छा नसल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, जयंत पाटील आणि आमची भेट नाही, अर्थखात्याची चर्चा झाली हा तर्क कुठला ज्या पध्दतीने दादांशी संवाद होता त्याचपध्दतीचा संवाद वहिनींशी आहे. त्यामुळे गैरसमज असण्याचा प्रश्नच येत नाही किंवा उद्भवत नाही...

जयंत पाटील आणि आमची भेट तिथे झाली नाही. आम्ही आलो जयंत पाटील आले आणि अर्थ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *