नरहरी झिरवाळ यांची माहिती, लाचखोरी प्रकरणी गोपनीय अहवाल मागवला दालनातच ३५ हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी अहवाल मागवला

मंत्रालयातील माझ्या दालनात लाचखोरीचा जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. हे कलंक लावणारे  वर्तन असून  मी तात्काळ लिपीक राजेंद्र ढेरंगे याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करुन गोपनीय अहवाल देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, अशी माहिती अन्न  आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंगळवारी येथे दिली.

गेल्या आठवड्यात मंत्रालयात लाचखोरीचा प्रकार घडला. नरहरी झिरवाळ यांच्या दालनात त्यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगेला ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचखोरीचा प्रकार घडल्यानंतर झिरवाळ यांनी  सोमवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती.

या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी आज पत्रकार परिषदेत लाचखोरीच्या प्रकरणात खुलासा केला. आपल्या कार्यालयात घडलेल्या घटनेबाबत आपण अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर  ढेरंगेवर पुढील कारवाई केली जाईल. ढेरंगे याच्याशी कोणाचा संबंध  आढळून आला तर  त्यालाही याचे परिणाम भोगावे लागतील, असा  इशाराही त्यांनी दिला.

नरहरी झिरवाळ शएवटी म्हणाले की, या प्रकरणाची दखल घेत विभागातील अधिकाऱ्यांची  मी बैठक घेणार आहे. यापुढे विभागाच्या कारभारावर माझी बारीक नजर असणार आहे. कुणी मुद्दामहून हे  प्रकरण घडवून आणले असेल असे मला वाटत नाही. कारण मी कोणाचा स्पर्धक नाही. सर्वच पक्षांसोबत मी काम केले आहे.  त्यामुळे मी असे करणार नाही याची सगळयांना जाणीव असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?

काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *