विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी डॉ प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही निवडणूक

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे होणाऱ्या नऊ जागांकरिता भारत निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या नऊ सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाने नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एक जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या एकूण १० जागेसाठी मंगळवार १२ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.

विधान परिषद सदस्य संजय केणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या नऊ सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. त्याचप्रमाणे विधानपरिषद सदस्य डॉ.प्रज्ञा सातव यांच्या सदस्यत्वाची मुदत २७ जुलै २०३० रोजी संपणार आहे.

या निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, २३ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तर नामनिर्देशन पत्र गुरूवार, ३० एप्रिल २०२६ रोजी सादर करण्यात येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी शनिवार २ मे २०२६ रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक सोमवार ४ मे २०२६ असा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बुधवार १३ मे २०२६ रोजी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांची मागणी, निकृष्ट आणि बोगस बियाणे प्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करा दोषी कंपन्यांना बियाणे विकण्याचे परवाने करणार रद्द- कृषिमंत्र्यांनी केली घोषणा

विदर्भातील अकोला, अमरावती आणि इतर जिल्ह्यांमध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणांमुळे हजारो शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *