काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा खोचक सवाल, यात मोदीजी येतातच कुठे ? सोमनाथ मंदिर : कल्पना सरदार पटेल यांची, कृती मुन्शी-गाडगीळांची, आशीर्वाद प्रसादांचा

सोमवार दि. ११ मे रोजी गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार / पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ७५ वर्षांपूर्वी, गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते.  अधिवेशनादरम्यान एका सायंकाळी वेरावळ येथील कार्यक्रमात सोमनाथ मंदिरावर अनेकदा झालेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करत सदर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा मानस सरदार पटेल त्यांनी व्यक्त केला.  इतकेच नव्हे तर पुनर्बांधणीची जबाबदारी गुजरातचे तत्कालीन ज्येष्ठ नेते कन्हैयालाल मुन्शी व तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ या दोघांवर आपण सोपवत असल्याचे सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू व इतर नेत्यांशी चर्चा करून घोषित ही केले.  तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनीं उदघाटनही केले होते.

हा सर्व इतिहास विसरत, पंतप्रधान व  काही मुख्यमंत्री लेख व कार्यक्रमाद्वारे आपणच जणू मंदिराचे निर्माते आहोत असे गेल्या काही दिवसापासून भासवत आहेत. काँग्रेस हा अल्पसंख्यांकांचा  लांगुनचालन करणारा पक्ष अशी सात्यत्याने टीका करणाऱ्या भा. ज. प. ला, याच काँग्रेसने हिंदूंचे मंदिर उभारल्याच्या इतिहासाचा विसर पडावा याचे आश्चर्य वाटते.

सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीशी संबन्धित सर्व व्यक्तींच्या कुटुंबियांना आम्ही कार्यक्रमाला आमंत्रित करीत आहोत असा निरोप मंदिर व्यवस्थापनाकडून काकासाहेब गाडगीळ यांचे नातू माजी आमदार अनंत गाडगीळ यांना १५ दिवसापूर्वी देण्यातही आला होता.

इतकेच नव्हे तर अनंत गाडगीळ यांचा पत्ता, फोन नंबर इ सर्व तपशील गुजरात काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला होता.  मात्र आजच्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही  आपणास  देण्यात आले  नसल्याचे गाडगीळ यांनी उघड केले आहे’

सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्यांकडून मात्र आजचा कार्यक्रम उरकण्यात येत आहे अशी उपरोधक टीकाही गाडगीळ यांनी केली आहे

About Editor

Check Also

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण • सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक• हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *