वर्षा गायकवाड यांचा आरोप, जालन्यात बैल विक्रीच्या आरोपातून दलित तरूणाला शेण खायला लावल्याचा संतापजनक प्रकार भाजपा सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात गुंडगिरी, फडणवीस सरकारचे मात्र दुर्लक्ष

जालन्यात दलित तरुणावर बैल विक्रीचा आरोप करत मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि त्याला शेण खायला भाग पाडल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे, त्याच्या ११ वर्षांच्या मुलालाही अशीच अमानुष वागणूक देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे, या गुंडांना अद्दल घडवावी तसेच जालन्यातील प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मे महिन्यात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. गोरक्षणाच्या नावाखाली एखाद्या माणसाला मारहाण आणि छळ करण्याचा अधिकार कोणी दिला? बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालण्याचे हे प्रकार वाढत चालले आहेत. ही केवळ एका व्यक्तीला केलेली मारहाण नाही, हा संविधानाने दिलेल्या समानता आणि मानवी प्रतिष्ठेच्या अधिकारावर हल्ला आहे. जातीय अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेली गुंडगिरी थांबवा अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकारच्या काळात दलितांवरील अन्याय अत्याचार वाढले आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सभा घेतलेल्या जागेचे तथाकथित शुद्धीकरण केले जाते, त्याचे जाहीरपणे समर्थनही केले जाते पण भाजपाकडून त्यावर मौन पाळले जाते. ही मनुवादी विकृती देशभर फोफावत चालली आहे. शिव, शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यातही ही विकृती डोके वर काढत आहे ही चिंतेची बाब आहे. या विकृत मानसिकतेला कोण खतपाणी घालते हे सर्वांना माहित आहे, पण सरकार मात्र त्याकडे कानाडोळा करत आहे, असा आरोपही यावेळी केला.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची घोषणा, पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *