मुंबई महापालिकेने हे फटाके उडविण्यास घातली बंदी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत रस्ते व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंधात्मक बंदी घालण्याबाबत

दिवाळीला सुरुवात झाली असून मुंबईच्या रस्त्यावर आणि गल्लीबोळात विविध प्रकारचे फटाके उडविण्यास नागरिकांकडून, तरूणांकडून सुरुवात झाली आहे. ज्याअर्थी, मुंबई शहर व उपनगरांमध्ये फटाक्यांमुळे आग लागण्याच्या अनेक घटना गेल्या दोन दिवसांत निदर्शनास आल्या आहेत. विशेषतः रॉकेट व तत्सम आकाशात उडणारे फटाके उडविताना त्यांचे जळते अवशेष इमारतींच्या छतांवर, बाल्कनीमध्ये, खिडक्यांमध्ये तसेच ज्वलनशील साहित्यावर पडून आग लागण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा दावाही मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. तसेच त्या अनुषंगाने आदेशही जारी करण्यात आला आहे.

मुंबई शहर व उपनगरांमधील दाट लोकवस्ती, उंच इमारती, झोपडपट्टी क्षेत्रे, अरुंद रस्ते, वाहनतळ तसेच व्यावसायिक व निवासी इमारतींची घनता लक्षात घेता, अशा प्रकारच्या फटाक्यांमुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्याअर्थी, सार्वजनिक सुरक्षितता व संभाव्य आग दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.


आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ४१ (ए) (सुधारित), कलम २६ (२), कलम ३० व ३४ (एम) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, अध्यक्ष, शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांचेद्वारे खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले आहे. सविस्तर आदेश खालील प्रमाणे…

१. प्रतिबंधात्मक बंदी :

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे.

२. बंदी लागू असणारी ठिकाणे :

सदर बंदी बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक तसेच खासगी जागा, निवासी इमारती, इमारतींचे टेरेस, गच्ची, बाल्कनी, अंगण, वाहनतळ, झोपडपट्टी क्षेत्र तसेच इतर सर्व परिसरांना लागू राहील.

३. आदेशाचा कालावधी :

सदर आदेश दिनांक ०९ नोव्हेंबर २०२६ रोजी आदेश प्रारित केल्याच्या वेळेपासून दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:१५ वाजेपर्यंत लागू राहील.

४. अंमलबजावणी :

संबंधित परिमंडळीय पोलीस उपायुक्त, महानगरपालिकेचे विभागीय सहाय्यक आयुक्त व अग्निशमन विभाग यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याची खबरदारी आणि महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याची व्यापक प्रसिद्धी द्यावी.

५. इतर फटाक्यांबाबत :

रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांव्यतिरिक्त इतर फटाक्यांचा वापर हा प्रचलित कायदे, शासन प्रतिबंधक आदेश तसेच न्यायालयांचे निर्देशानुसार नियंत्रित राहील.

सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असेही मुंबई महापालिकेने पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका उपायुक्त, परिमंडळ १ ते ७, सहाय्यक आयुक्त, ए ते टी विभाग, प्रमुख अग्निशमन अधिकारी यांना आदेश जारी केले.

About Editor

Check Also

आदेश उच्च न्यायालयाचा, जनहितार्थ व्हिडीओ बीएमसीचा तर टीका सगळी भाजपा नेत्यांची अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या व्हिडीओवर भाजपा नेत्यांची टीका

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झाची निवड केली होती. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *