हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे आवाज उठवा SIR प्रक्रियेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर बीएलए प्रतिनिधींशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व प्रभारी यांचा संवाद

काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करावे. बूथपासून जिल्हास्तरापर्यंत संघटनात्मक बांधणीला गती देत पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवावीत. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून पक्षसंघटना अधिक सक्रिय करावी, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

मराठवाडा विभागातील लोकसभा मतदारसंघ प्रभारी, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघ प्रभारी यांची संघटनात्मक आढावा बैठक प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथे पार पडली. या बैठकीला सहप्रभारी रेहाना चिस्ती, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार शिवाजी काळगे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस गुरबिंदर बच्छर, आदित्य पाटील आणि बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मराठवाड्यातील पक्षसंघटनेची सद्यस्थिती, सुरू असलेले संघटनात्मक उपक्रम आणि आगामी काळातील पक्षविस्ताराच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

काँग्रेसच्या बीएलए प्रतिनिधींशी संवाद..

हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, SIR प्रक्रियेच्या अंमलबजावणीत मतदारांना आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या प्रतिनिधींना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे जाणून घेण्यासाठी झिरपी (ता. अंबड, जि. जालना) येथे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या BLA-2 प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसच्या BLA-1 प्रतिनिधींनी SIR प्रक्रियेदरम्यान सरकारी BLO यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची गंभीर बाब मांडली. सत्ताधारी पक्षाचे BLA-1 आणि सरकारी BLO यांच्या संगनमतातून ही प्रक्रिया राबविली जात असल्यामुळे काही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक माहिती आणि सहकार्य मिळत नाही.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, SIR च्या नावाखाली एकाही पात्र मतदाराचे नाव वगळले जाता कामा नये. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि सर्वांना समान सहकार्य मिळणे आवश्यक आहे. मतदारांचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे BLA प्रतिनिधी सजगपणे काम करत असून त्यांच्या अडचणी आणि तक्रारींचा गांभीर्याने पाठपुरावा केला जाईल असे सपकाळ म्हणाले.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, २०० मतदारसंघांतील संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाची माहितीच निवडणूक आयोगाकडे नाही. महाराष्ट्रातील ११४ मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. आकडेवारी गायब, पारदर्शकता गायब, उत्तरदायित्व गायब आणि तरीही निवडणूक आयोगाची मुजोरी कायम आहे. सत्तेच्या दबावाखाली लोकशाहीच्या विश्वासार्हतेशी खेळण्याचा अधिकार आयोगाला कोणी दिला? जनतेच्या मतांचा हिशेब द्या, संपूर्ण डेटा सार्वजनिक करा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, असेही सपकाळ म्हणाले..

यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, शहराध्यक्ष विशाल धानुरे, जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर, राजेंद्र राख, राजाभाऊ देशमुख, प्रभाकर पवार, तालुकाध्यक्ष श्रीरंग कामठे आणि कल्याण तारडे उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, दुष्काळ निवारणासाठी भाजपा महायुती सरकारकडे नियोजन नाही भाजपा आमदार महेश बालदींचे विधानसभा सदस्यत्व तात्काळ रद्द करा

राज्यातील जनतेला दुष्काळाचे भयंकर चटके बसत आहेत, ग्रामीण भागासह शहरातही पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रचंड आहे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *