META (फेसबुक, इन्स्टाग्राम) कार्यालयाबाहेर मुंबई युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन भाजप आणि संघाविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याच्या कारवाईचा निषेध

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात आवाज उठवणाऱ्यांची सोशल मीडिया खाती निलंबित करून लोकशाहीवादी आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने बीकेसी येथील वर्ल्ड वनमधील META कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनिष शर्मा यांची सोशल मीडिया खाती निलंबित करण्यात आल्याची घटना म्हणजे विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारणाऱ्या आणि विरोधी मते मांडणाऱ्यांचे आवाज बंद करण्याच्या या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला.

लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि आपले मत मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. सोशल मीडिया अकाउंट निलंबित करून हा अधिकार हिरावून घेण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला.

यावेळी ‘meta भाजपाचा बेटा ‘अशा घोषणा देण्यात आल्या

या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी पवन मजीठिया, प्रदेश महासचिव अमनदीप सैनी, उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष निखिल रुपारेल, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अब्दुल समद, उत्तर पूर्व जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, विधानसभा अध्यक्ष विकास जयस्वाल, आशिष सरोज, राहुल पेडणेकर, शिवेंद्र घोरपडे यांच्यासह मुंबई युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकशाहीवादी आवाज दडपण्याच्या कोणत्याही प्रयत्नाविरोधात युवक काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असेही झीनत शबरीन यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे आवाज उठवा SIR प्रक्रियेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर बीएलए प्रतिनिधींशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व प्रभारी यांचा संवाद

काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करावे. बूथपासून जिल्हास्तरापर्यंत संघटनात्मक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *