सामायिक कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात शिकाँरा अर्थात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसबरोबरील सामायिक कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि प्रवक्ते नवाब मलिक यांचा समावेश आहे.
नरिमन पाँईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली.
आज वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या विधानभवन परिसरातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधानभवनात आले होते. त्यानंतर त्यांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व रवाना झाले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *