Editor

काँग्रेसची मागणी, अतिवृष्टीमुळे मृत्यू पावलेल्यांना १० लाखाची मदत करा काँग्रेस शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात मागील १५-२० दिवसांत अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रती हेक्टरी ५० हजार रु, व बागायती शेतकऱ्यांना १ लाख रु प्राथमिक मदत तत्काळ द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

रामदास कदम यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी आता बोलणार फुटीर गटाच्या नेतेपदीही लगेच वर्णी

जसजशी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी जवळ येत आहे तसतसे बंडखोर गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या राजकिय धक्के देत हादरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने या दोघांसह माजी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाची नवी कार्यकारणी म्हणजे कॉमेडी सर्कस सीजन-२ फुटीर गटाला अधिकारच नसल्याचा लगावला टोला

सर्वोच्च न्यायालयात २० जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातील शिवसेना पक्षच हिसकावून घेण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यादृष्टीकोनातून शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या …

Read More »

एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना हायजॅक? नवी कार्यकारीणी जाहिर उध्दव ठाकरे यांना धक्का

मागील १५ ते २० दिवसापासून शिवसेनेतील आमदार, त्यानंतर जुने कार्यकर्त्ये, माजी नगरसेवक यांच्यानंतर आता खासदारांना सहभागी करून घेण्यासाठी अंतिम प्रयत्नात असलेल्या एकनाथ शिंदे गटाने आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कार्यकारीणी रद्द करत नवी कार्यकारीणी जाहिर केली. विशेष म्हणजे या नव्या राष्ट्रीय कार्यकारीणीत शिवसेना पक्षप्रमुख पदावर उध्दव ठाकरे …

Read More »

शिवसेनेतील १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे गटात? ऑनलाईन बैठकीला हजेरीची चर्चा राष्ट्रपती निवडणूकीनंतर नवे वळण

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याच्या मागणीवरून शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन तट निर्माण झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. त्यातच आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने राष्ट्रपती पदासाठी आजच मतदान होत असल्याने शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीला गेलेले. मात्र आज एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीला शिवसेनेच्या एकूण १८ …

Read More »

उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित रामदास कदमांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ आली नसती

काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांच्या विरोधात दापोलीतील रिसॉर्टप्रकरणाची माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुरविल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर रामदास कदम हे सातत्याने मातोश्रीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. तसेच उध्दव ठाकरे यांना भेटून प्रत्यक्ष आपली बाजू मांडण्याऐवजी त्यांनी पत्र लिहून या प्रकरणात काहीही संबध नसल्याचे …

Read More »

इंदौर-अमळनेर एसटी बस अपघात: मृतांच्या कुटुंबियांना १० लाखाचे आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. आज सकाळी इंदोर होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी …

Read More »

इंदौर-अमळनेर एसटी अपघात: १३ मृतदेह नदीतून काढले ८ जणांची ओळख पटली, पाच जणांच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदौ र- अमळनेर एसटी बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार …

Read More »

“या” जिल्ह्यांना पुढील ४ ते ५ दिवस रेड आणि यलो अलर्ट मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश

मागील दोन आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने चांगलीच हजेरी लावत सातत्याने पाऊस कोसळत आहे. परंतु मागील दोन दिवस पावसाने उघडीप दिली असे वाटत असतानाच आगामी ४ ते ५ दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत …

Read More »

उध्दव ठाकरे आले फुल्ल अॅक्शन मोडवर, बंडखोर समर्थकांवर कारवाईचा बडगा विश्वनाथ भोईर यांच्यापाठोपाठ भावना गवळी, संजय राठोड धक्का

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर त्यांच्यासोबत संजय राठोड हे गेले तर यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांच्या कृतीचे समर्थन करत उध्दव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेशी जुळवून घ्यावे असे आवाहन केले. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरी खपवून घ्यायचे नाही अशी भूमिका उध्दव ठाकरे …

Read More »