Editor

उपराष्ट्रपतीसाठी शिवसेनेचा पाठिंबा कोणाला? संजय राऊत यांनी केले स्पष्ट मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार असल्याचे केले स्पष्ट

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर या बंडखोरांकडून भाजपाशी जुळवून घ्या म्हणून उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केले. त्यातच खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित राष्ट्रपती पदासाठी भाजपाच्या उमेदवार असलेल्या द्रोपद्री मुर्मु यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी …

Read More »

राष्ट्रपती निवडणूकीसाठी “या” ठिकाणी होणार मतदान निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल यांनी केली निवडणूक तयारीची पाहणी

राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी आज विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुमलाही भेट दिली. त्याचबरोबर विधानभवनात झालेल्या बैठकीत सर्व संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी …

Read More »

गोदावरी, प्राणहीता पाणलोट क्षेत्रात नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

सततच्या पावसामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी …

Read More »

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जे गेले त्यांचा शोक करायचा नाही पण… गैरसमज झाले असतील तर दूर होतील आणि पुन्हा नदीचा प्रवाह सुरु होईल

शिवसेनेत बंडखोरी करून वेगळी चूल मांडणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर अनेक माजी नगरसेवकांसह शिवसैनिक त्यांच्या गटात सहभागी होत आहेत. तर काहीजण उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत राहणार असल्याचे जाहिरपण सांगत आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे …

Read More »

बंडखोरी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबतचा फैसला “या” तारखेला शिवसेनेच्या १६ आमदारांबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भवितव्यही ठरणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अल्पमतात आणले. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. …

Read More »

शरद पवार यांनी केली घोषणा, विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा भाजपाचे उमेदवार धनकड यांच्याशी देणार लढत

राष्ट्रपती पदासाठी भाजपाने द्रोपदी मुर्मु यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर काल संध्याकाळी उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांचे नाव भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहिर केले. त्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी झाली. त्यानंतर विरोधकांकडून धनखड यांच्या विरोधात काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी निश्चित …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंवर GST: व्यापाऱ्यांच्या संघर्षात काँग्रेस सोबत केंद्र सरकार विरोधातील संघर्षात काँग्रेस पक्ष छोटे व्यापारी व दुकानदारांसोबत- नाना पटोले

केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने महागाई गगनाला भिडली असताना केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर ५% जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील होणार आहे. या जुलमी निर्णयाविरोधात राज्यातील व्यापारी, दुकानदार रस्त्यावर ऊतरले असून, संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षात काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत …

Read More »

श्रीलंकेपासून आर्थिक धडे: भारताला तूटीचा पट्टा घट्ट आवळावा लागणार दिवाळखोरीतून भारताला अनेक आर्थिक धडे-लेखन स्वामीनाथन एस अंकलेसरीया अय्यर (टाईम्स ऑफ इंडियातून साभार)

नुकतेच श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या विरोधात राष्ट्रपती निवासस्थानात स्थानिक नागरीकांनी घुसखोरी करत विरोध प्रदर्शन आंदोलन केले. या नाट्यमय घडामोडीनंतर श्रीलंकेतील दिवाळखोरीमुळे एकदंरीतच अर्थव्यवस्थेशी संबधित अनेक शिस्त (थेअरींच्या) त्याचे विश्लेषण करण्यास असमर्थ ठरत आहेत. वास्तविक पाहता मागील काही वर्षापासून श्रीलंकेतील तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट (सरकारकडून प्रमाणाबाहेर खर्च) वाढत असल्याचे दिसून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश; ‘या’ दोन गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा खड्डे बुजविण्याचे काम अहोरात्र सुरु राहणार

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र  करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, …तर आता जीएसटीमुळे ब्रिटीशकालीन इतिहासाची पुनरावृत्ती होणार सुट्या अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी आकरणीवर दिला इशारा

केंद्र सरकारने आपले बिघडलेले आर्थिक गणित सुधारण्याच्या उद्दिष्टासाठी सुट्या अन्नधान्यावर आणि जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जसा व्यापाऱ्यांना बसणार आहे तसा तो सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे. परिणामी या जीएसटी कराची वसुली व्यापारी ग्राहकांकडूनच करणार असल्याने महागाईत आणखी वाढ होऊन सर्वसामान्य जनतेच्या खिशावर त्याचा …

Read More »