मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील २४ तासात आढळून आलेल्या बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या दुपटीहून अधिक आहे. आज ११ हजार ४१६ नवे बाधित रूग्ण आढळून आले असल्याने एकूण रूग्णसंख्या १५ लाख १७ हजार ४३४ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख २१ हजार १५६ वर आली आहे. तर बाधित …
Read More »याच ट्विटमुळे भाजपाशासित राज्यात अभिनेत्री कंगना विरोधात गुन्हा दाखल होणार कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना आदेश
बंगलोर : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी संसदेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्या विरोधावर टीका करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हीने शेतकऱ्यांना लक्ष्य करत ट्विट्द्वारे आंतकवादी असल्याची टीका केली. त्यावर तुमकुरू जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता त्यावरील सुणावनी दरम्यान न्यायालयाने कंगना …
Read More »महिलांवरील अत्याचार आणि बंद मंदिरांच्या विरोधात भाजपातर्फे १२, १३ रोजी आंदोलन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवार १२ व १३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत …
Read More »हाथरस घटनेनंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून नवी नियमावली भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशतील हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातील महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी एक नवी नियमावली केंद्र सरकारने जारी केली. तसेच या नव्या नियमावलीची अंमलबजावणी सर्व राज्य सरकारांनी करावे अशी सूचनाही केंद्राने दिल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली. तसेच ही नियमावली सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालातील …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी धनगर समाजाला दिले हे आश्वासन धनगर समाज शिष्टमंडळाशी विविध मुद्यांवर चर्चा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला. धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची शुक्रवारी ( दि.९) सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे …
Read More »फडणवीस सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकारमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी देशाचा गुन्हे दर (Crime rate) वाढत असताना महाराष्ट्राचा गुन्हे दर मात्र २०१८-१९ च्या तुलनेत तोच राहिला असून महाराष्ट्र हे आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हे दर केरळ, तेलंगाणा, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांचा आहे. तसेच राज्याचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दर हा वाढला असून २०१८ मध्ये जो ४१.४१ होता …
Read More »एमपीएससीची परिक्षा पुन्हा ढकलली पुढे पण वयोमर्यादा तीच राहणार नव्या तारखेस होणाऱ्या परीक्षेस सध्याचे पात्र उमेदवार बसू शकणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परीक्षेस बसता येणार असून कुणीही अपात्र ठरणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोना …
Read More »कोरोना: एकूण बाधित पुणे नंतर मुंबई आणि ठाणेतही २ लाखापार; एकूण १५ लाख रूग्ण १२ हजार १३४ नवे बाधित, १७ हजार ३२३ बरे झाले तर ३०२ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत असली तरी दुसऱ्याबाजूला एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या वगळण्यात आलेली नसल्याने एकूण बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या पुणे जिल्ह्याची असून …
Read More »राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना वेतन सुसुत्रीकरण लागू राज्यातील २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना होणार लाभ- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुसुत्रीकरण लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याचा राज्यातील सुमारे २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. विशेष म्हणजे अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ५९७ संवर्गातील पदांचे एकत्रीकरण करून त्याचे ६९ संवर्गात रुपांतर करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनाचा लाभ १ …
Read More »महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे १२ ऑक्टोंबरला राज्यभर निदर्शने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत , अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रदेश माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक …
Read More »
Marathi e-Batmya