या सात आयएएस अधिकाऱ्यांची झाली बदली चोकलिंगम आता यशदाचे महासंचालक

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या आज राज्य सरकारकडून बदल्या करण्यात आल्या. त्या खालीलप्रमाणे…
१) एस चोकलिंगम, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नियुक्ती महासंचालक, यशदा पुणे या पदावर

(२) श्रावण हर्डीकर महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर

(३) राजेश पी पाटील (Odissa Cadre) आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे या पदावर

(४) श्रीमती शितल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर

(५) श्रीमती प्रेरणा देशभ्रतार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वर्धा या पदावर

(६) श्रीमती अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर

(७) एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती

 

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अशोक नगरमधील डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेले मृत्यू ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी कुर्ला पश्चिम आणि घाटकोपर पश्चिममधील धोकादायक भागांचे ऑडिट करून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी एप्रिलमध्ये करूनही बीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर येथे डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *