मुंबई : प्रतिनिधी देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक पुरोगामी राज्य असल्याचे आतापर्यत सर्वच नेत्यांनी सांगत त्याविषयीच्या परंपरेत खंड पडू दिला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराजांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून सांगितला जातो. मात्र दोनच दिवसापूर्वी अर्थात २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले …
Read More »स्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या विषाचं इंजेक्शन घेतल्याची चर्चा
चंद्रपूर : चंद्रपूर ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी केली आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल आमटे या सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ.विकास आमटे …
Read More »केवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
पुणे : प्रतिनिधी राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने गेले वर्षभर केवळ सत्ता टिकविण्यासाठी धडपड केली. पूर्णपणे अपयशी ठरलेल्या या सरकारमुळे राज्यातील सर्वसामान्य माणूस भरडला गेला, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुणे येथे केली. महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षातील अपयशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते …
Read More »कोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल ५ हजार ५४४ नवे बाधित, ४ हजार ३६२ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दररोज ७० ते ८० हजार तपासण्या होत असल्या तरी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र ही संख्या नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी दररोज आढळून येणाऱ्या संख्येने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येने पुन्हा एकदा एक लाख संख्येकडे वाटचाल सुरु केली आहे. मागील २४ तासात राज्यात ५ हजार ५४४ नवे बाधित …
Read More »रेल्वेचा अजब कारभार : निवड झालेल्या राज्यातील ५६५ जणांना नोकरीवरच घेईना १ डिसेंबर रोजी सीएसएमटीला आंदोलन करण्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करत नोकर भरतीच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या. मात्र या प्रक्रियेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ५६५ उमेदवारांना वर्ष होत आले तरी अद्याप नोकरीवर रूजूच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून लवकरात लवकर …
Read More »मराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका
सातारा : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकविण्यात सध्याचे राज्य सरकार अपयशी ठरल्याने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो असे आवाहन भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे यांनी करत ती मोठी माणसे आहेत, ते मराठा स्ट्राँगमॅन म्हणून ओळखली जातात त्यांच्याकडून मराठा समाजाला न्याय मिळणार नसल्याचे …
Read More »मंत्रालयातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती मिळणे होणार बंद सामान्य प्रशासन विभाग बनवतंय नवे धोरण
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनात “मलाईदार प्रतिनियुक्ती” वर असलेल्या पदांची अनेकांना भुरळ पडली आहे. त्यात महसूल विभाग अग्रेसर असला तरी इतर विभागातही त्याची थोड्या फार प्रमाणात लागण झालेली आहे. त्यामुळे विशेषत: मंत्रालयीन केडरच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या बाहेरील पदांवर प्रतिनियुक्तीवर जाणे आता बंद करण्यात येणार असून त्याविषयीचे नवे धोरण सामान्य प्रशासन …
Read More »कोरोना लस सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत पण जुलैमध्ये… सिरमचे इन्स्टीट्युटचे प्रमुख पुनावाला यांची माहिती
पुणे : प्रतिनिधी भारतासह जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणीवर सगळ्यांच लक्ष आहे. तसेच त्याच्या यशस्वी ट्रायलनंतर लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस बनविणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली. कोरोनावर लस बनविणाऱ्या …
Read More »कोरोना : तपासण्या ७० हजाराहून अधिक मात्र बाधितांची संख्या नियंत्रणातच ५ हजार ९६५ नवे बाधित, ३ हजार ९३७ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसाकाठी तपासण्यांचे प्रमाण ७० हजाराहून अधिक असूनही दैंनदिन बाधितांचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात ८६ हजार ५९८ तपासण्या करण्यात आल्यानंतर नवे बाधित ५ हजार ९६५ इतके आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८ लाख १४ हजार ५१५ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या …
Read More »या ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनाकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या आयटी आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव चंद्रा रस्तोगी यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर डॉ.एच.मोडक यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. डॉ.संदिप राठोड यांची हाफकिन बायो-फार्मा कार्पोरेशनच्या …
Read More »
Marathi e-Batmya