Editor

डॉ पंकज भोयर यांचे निर्देश, कारागृह पुनर्विकास आणि आधुनिकीकरण प्रकल्पांना गती द्या कारागृह विकास प्रकल्पांमुळे बंदी क्षमता व सुविधा वाढणार

राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ मे २०२६ रोजी आयोजित कारागृहाबाबत आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अनुपालनाबाबत मंत्रालयात राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग

जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या यूएई आणि भारत देशातील बँकांमध्ये बँकिंग भागीदारी होत आहे. ही बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. कुलाबा येथील हॉटेल ताज पॅलेस येथे यूएई देशातील एमिरेट्स एनबीडी (नॅशनल बँक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल

कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निर्णायक टप्पा आहे. केंद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे राबवून विदर्भाला कोळसा वायूकरण आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनांचे प्रमुख केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज लँडस …

Read More »

व्हिप झुगारल्याने शिवसेना उबाठाच्या त्या सहा खासदारांची खासदारकी रद्द होईल का ? पक्षाच्या बैठकीसाठी व्हिप लागू होत नसल्याची काही तज्ञांची माहिती

संजय बोपेगांवकर शिवसेना उबाठा पक्षातील सहा खासदारांनी दिल्लीत झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला पक्षाचा व्हिप झुगारून गैरहजेरी लावल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पक्षाने जारी केलेला ‘व्हिप’कडे दुर्लक्ष केल्यामुळे आता त्या खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होणार का? असा मोठा घटनात्मक प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक कायदेशीर आणि राजकीय …

Read More »

शिवसेना उबाठाच्या त्या सहा बंडखोर खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले रात्री राजस्थान वरून मुंबईत येण्याची शक्यता

काल शिवसेना उबाठा पक्षाने बोलाविलेल्या बैठकीसाठी दिल्लीतील खासदारांना व्हिप जारी केल्यानंतरही ते सहा बंडखोर खासदारांनी बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. आता ते सहा खासदार फुटल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हा शिवसेना उबाठा सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आता या सहा खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय प्लस सुरक्षा …

Read More »

आदिती तटकरे यांचे निर्देश, २३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश, एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामसभा ठराव करणार

संयुक्त राष्ट्रसंघाने  घोषित केलेला २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, यावेळी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींमध्ये ठराव करण्यात यावा, असेही त्या म्हणाल्या. राज्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी द्या केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली प्रभावी बाजू

महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली. या खाणी राज्य शासनाला मिळाल्यास दोन वर्षात कार्यान्वित करून २०३० पर्यंत उत्पादन सुरू करून पुढील काळात स्टील …

Read More »

छगन भुजबळ नाराज नाहीत ? राज्यसभेच्या उमेदवारी वरून व्यक्त केली अप्रत्यक्ष नाराजी

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या हालचाली मागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय …

Read More »

शरद पवार यांची अपेक्षा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे आठ-दहा दिवसांनी आम्ही बोलावून त्यातून मार्ग काढू

आज इंडिया आघाडीची मिटिंग आहे. आम्ही पुन्हा आठ दहा दिवसांनी प्रमुख लोकांना बोलवून त्यातून मार्ग काढू. मार्ग निघेल याची खात्री आहे. आजची आढावा मिटिंग आहे. या बैठकीत कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असं सूत्र ठरवलं जाणार आहे. राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या मिटिंगला गेल्या आहेत. संध्याकाळपर्यंत त्याचं आऊटकम कळेल. त्यानंतर दिल्लीत …

Read More »

मागासवर्गीय अधिकाऱ्यांची पदोन्नतीत अडवणूक सामान्य प्रशासन विभागाकडून पदोन्नतीच्या आदेशात अनियमितता

पदोन्नतीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने  ‘जैसे थे’  आदेश दिले असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून खुल्या प्रवर्गातील अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या मंत्रालयातील   मागासवर्गीय अधिकार- कर्मचाऱ्यांची अडवणूक केली आहे. पदोन्नतीचे आदेश जारी करण्याबाबत चालढकल होत असल्याने मागासवर्गीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. मर्यादित विभागीय …

Read More »