हिंसाग्रस्त मणिपूर राज्याला कायदेशीर आणि मानवतावादी पाठिंबा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचे सहा न्यायाधीश २२ मार्च रोजी मणिपूर उच्च न्यायालयाच्या द्वैदशकीय समारंभाच्या निमित्ताने राज्याला भेट देतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी.आर. गवई, सूर्यकांत, विक्रम नाथ, एम.एम. सुंदरेश, के.व्ही. विश्वनाथन, एन. कोटीश्वर सिंह हे विशेष भेटीला येणार आहेत. …
Read More »ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, सरकारचा तो शासन निर्णय़ रद्द न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (१७ मार्च) शेतकऱ्यांना ‘उशीराने आणि कमी’ रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) देण्याची तरतूद करणारा शासन निर्णय़ (GR) रद्द केला आणि रद्दबातल ठरवला कारण त्याचा शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने …
Read More »मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाचाही दिलासा शिक्षा आणि दोषसिद्धला नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार सर्व प्रतिवादींना बजावली नोटीस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानंतर आता उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षा आणि दोषसिद्धला निर्णयाला दिलेली स्थगिती उठवण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. तसेच सर्व प्रतिवादींना नोटीस …
Read More »समुद्राच्या गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती
समुद्राच्या पाण्याचे विलोपन (Desalination) हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुंबई शहर व उपनगरातील पाणीपुरवठाविषयी लक्षवेधीला सूचनेला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले,मुंबईतील वाढत्या पाणीटंचाईला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केली घोषणा
नियमानुसार देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाठ व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आता ‘ फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट’ ची स्थापना करण्यात येईल. या युनिटच्या माध्यमातून अशा योजना जाहिरातींची माहिती घेऊन ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, तेव्हा एकनाथ शिंदे डस्ट बिनमध्ये होते हे माहित नव्हते पंतप्रधान मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले दाव्याला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर
विधान परिषदेत नागपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तुमच्या पक्षाच्या नेत्याने लोटांगण घातले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोण कोणाकडे जातोय याची सगळी माहिती आपल्याला असल्याचे सांगत मी तिथे युतीचे सरकार स्थापन करू असे सांगितले मात्र इथे आल्यानंतर पुन्हा पलटी मारली …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, …माफी मागण्याचा प्रश्नच नाही! सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का?
फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यावे की तुमचे घर पेटले आहे. औरंगजेबाची कबर यांना का आठवत आहे? कारण सरकारचे अपयश लपण्यासाठी हे सगळे सुरू आहे. लाडकी बहीण, महिला अत्याचार, …
Read More »गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती, २०२ घुसखोरांना हद्दपार केले विधानसभेत भाजपा आमदार संजय उपाध्याय यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना माहिती
मुंबईसह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात बांग्लादेशीय घुसखोर आढळणे ही गंभीर बाब आहे. पश्चिम बंगाल मधील एजंटस मार्फत यांना आधारकार्डसह कागदपत्रे मिळतात, त्यापैकी अनेक पात्र सिद्ध होतात. आतापर्यंत २०२ घुसखोरांना हद्दपार केले. अटक केलेल्यांना ठेवण्यासाठी नवीन डिटेन्शन सेंटर निर्माण करण्यात येईल. केंद्र सरकारशी संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याची विनंती केली जाईल असे गृह …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आश्वासन, राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, चंद्रकांत सोनावणे यांच्या बैठकीत सूचना
राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी ” बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा ” या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व अंबोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकाला प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना …
Read More »डॉ नितीन राऊत यांचा आरोप, सेन्सॉर बोर्डाकडून दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न नामदेव ढसाळ यांच्या वरील चित्रपट 'चल हल्ला बोल' प्रदर्शित करण्याची विधानसभेत मागणी
मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी बंडखोर कवी तथा दलित पँथर चळवळीचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारून दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असे वक्तव्य करून चित्रपटाला कुठलीही कात्री न लावता हा चित्रपट तात्काळ प्रदर्शित करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आणि …
Read More »
Marathi e-Batmya