राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करून विविध स्तरांवर आढावा घेतला जाईल असे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य चित्रा वाघ यांनी विशाखा समिती संबंधित उपस्थितीत केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या. महिला व …
Read More »भिवडींत शिवाजी महाराज यांच्या पहिल्या मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडे पाडा, ता.भिवंडी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी वाळू धोरण विधान परिषदेत अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे यांची माहिती
वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात महसूल आणि पोलीस दलाकडून संयुक्त कारवाई करण्यात येते. परंतु राज्यात वाळू माफिया आणि वाळू तस्करीच्या घटना वाढतच आहेत. यासाठीच राज्य शासन सर्वंकष वाळू धोरण तयार करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेमध्ये दिली. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला …
Read More »रामदास आठवले यांचा आरोप, विकास बनसोडे बौध्द युवकाची हत्या ऑनरकिलिंगमधूनच खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी
बीड जिल्हातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात ट्रक चालक म्हणुन काम करणाऱ्या बौध्द युवक विकास बनसोडे यांची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली. दोन दिवस घरात डांबुन ठेवून बेदम मारहाण करुन क्रूरपणे आकाश बनसोडेची हत्या करण्यात आली. या निर्घुण हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार, भाजपाचे नेतेच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करतायत वेंद्र फडणवीसांच्या कारभारावरील टीकेने मराठी अस्मितेला ठेच कशी पोहचते? छत्रपतींच्या अपमानाने मराठी अस्मितेला ठेच पोहचत नाही का?
महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरु आहे तो अत्यंत वाईट आहे. संतोष देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजापाचे काही नेतेच देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत, असे …
Read More »नितेश राणे यांचे आश्वासन, नीलकमल बोट अपघात प्रकरणी अहवालानंतर दोषींवर कारवाई विधान परिषदेत मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन
मुंबईतील नीलकमल बोटीच्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याबाबत नौदल विभागाकडून सदर अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी मुख्य बंदर अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे , या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री …
Read More »विधान परिषदेत हर्षवर्धन सपकाळ पडले एकटे, भाजपा आणि शिवसेना उबाठा एकत्र अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या त्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गोंधळ
विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभापती राम शिंदे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले असल्याचा मुद्दा उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला …
Read More »वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी, महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाकडे सोपवा आणि बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्याची मागणी
बोधगया येथील महाबोधी महाविहार हे स्थळ बौद्ध समुदायासाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. १९४९ च्या बोधगया मंदिर कायदा अंतर्गत या ऐतिहासिक स्थळाचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाच्या हातात नाही. मंदिर व्यवस्थापन समितीमधील नऊ सदस्यांपैकी पाच अन्य समाजाचे व केवळ चार बौद्ध समाजाचे असतात हे अन्यायकारक असून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाकडे …
Read More »अजित पवार यांचा विरोधकांना टोला, तुमच्याकडे आमदारच नाही, १०-२० टाळकी पाठिंबा देणार का? शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव यांनी टाळकी शब्दावर घेतला आक्षेप
नुकताच होळी आणि धुलवड सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे यावे आम्ही त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री करू असे विधान केले. तसेच बुरा ना मानो होली है असे सांगायलाही विसरले नाहीत. त्यावरून राज्यात महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे …
Read More »अजित पवार म्हणाले, जयंतराव ऊसाचं टनेज वाढलं की नाही… पण तुमचा… संबध नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि अजित पवार यांच्यातही मिश्कील संवाद
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या राज्यात सुरु आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला आज अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार हे सातत्याने जयंतराव पाटील यांना …
Read More »
Marathi e-Batmya