Editor

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? केस गळतीवरील पद्मश्री हिम्मतराव बावस्करांच्या संशोधन अहवालाला सरकारने केराची टोपली दाखवली का?

बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा …

Read More »

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विधानसभेत गोंधळ, सत्ताधाऱ्यांचा सवाल आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? एसआयटी पथकाकडून अद्यापही चौकशी सुरु- राम कदम

मागील अनेक वर्षापासून बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सातत्याने शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भात विधान परिषदेत काही दिवसांपूर्वी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर हाच मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला.  तसेच दिशा सालियान हत्या प्रकरणी तिच्या …

Read More »

कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाच्या आ. प्रविण दरेकरांनी मांडला हक्कभंग

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. तिच कविता, त्याच चालीत, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली होती. याचे पडसाद आज विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव …

Read More »

अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड विरोधी पक्षनेते पदावर मुख्यमंत्री म्हणाले...

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. आज अधिवेशनाचे सूप वाजत आहे. मागील ३ मार्चपासून हे अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळे गाजले आहे. सामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा अन्य विषयामुळे… अन्य कारणामुळे हे अधिवेशन गाजले. दरम्यान, आज विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) अण्णा दादू बनसोडे यांची …

Read More »

विधानसभेत भास्कर जाधव यांचा हल्ला बोल, तर पत्र मागे घेतो… विरोधी पक्षनेता पदी निवड का नाही ?

विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आल्यानंतर विरोधकांकडून भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, अधिवेशन संपत आले. आज शेवटचा दिवस आहे. उपाध्यक्ष पदाची निवड झाली, मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही झाली? असा सवाल उपस्थित केला. विधानसभेच्या विरोधी …

Read More »

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्याची परवानगी नाकारली ७० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट

लोकसभेचे उपनेते गौरव गोगोई, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि काँग्रेसचे व्हीप माणिकम टागोर आणि इतर ७० जणांसह काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांनी बुधवारी (२६ मार्च २०२५) लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात संधी नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी राहुल गांधी यांना …

Read More »

अर्थ विभाग, रिझर्व्ह बँकेने जाहिर केले एच-१ कर्जाचं कॅलेंडर २०२५-२६ या वर्षासाठी सहामाही कर्ज घेण्याची योजना

२०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीसाठी कर्ज घेण्याच्या योजनेवर निर्णय घेण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी बुधवारी बैठक घेतील, असे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी बाजारातील रोख्यांद्वारे घेतलेले एकूण कर्ज १४.८२ लाख कोटी रुपये आणि निव्वळ कर्ज ११.५४ लाख कोटी रुपये असे निश्चित केले आहे. विमोचनामुळे आर्थिक …

Read More »

अमेरिकेबरोबरील वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर भारताने उद्योग टॅरिफ मध्ये केली कपात भारताने १०.६६ टक्के उद्योग कर अर्थात टॅरिफमध्ये घट

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटी आणि परस्पर कर आकारणीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने आपला सरासरी औद्योगिक कर १०.६६% पर्यंत कमी केला आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत दिली. “डब्लूटीओ WTO २०२३ नुसार, भारताचा साधा सरासरी कर दर १७% आहे. २०२३ मध्ये औद्योगिक वस्तूंचा कर १३.५% होता… २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर, …

Read More »

गुगल आणि मेटाच्या डिजीटल जाहिरातीवरील ६ टक्के लेव्ही रद्द करणार अमेरिका-भारत दरम्यानच्या व्यापारी चर्चेच्या अनुषंगाने केंद्राचा निर्णय

भारत १ एप्रिलपासून गुगल आणि मेटा सारख्या परदेशी टेक कंपन्यांद्वारे प्रदान केलेल्या ऑनलाइन जाहिरात सेवांवरील ६% समीकरण शुल्क, ज्याला सामान्यतः ‘गुगल कर’ म्हणून संबोधले जाते, काढून टाकणार आहे. हा निर्णय भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध सुधारण्याच्या उद्देशाने वित्त विधेयक, २०२५ मधील सुधारणांचा एक भाग आहे, असे रॉयटर्सने वृत्त दिले …

Read More »

विमा सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार विधेयकाचा मसुदा चर्चेच्या अंतिम टप्प्यात

केंद्र सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुप्रतिक्षित विमा (सुधारणा) विधेयक सादर करू शकते, अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे की विधेयकाचा मसुदा अंतर्गत चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी सांगितले की, एप्रिल अखेरीस हे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकामुळे भारताच्या विमा क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये देशांतर्गत …

Read More »