मुनवर फारुकी युट्यूब आणि इंस्टाग्राम वरून कमावतो इतके रुपये

सध्याचा सोशल मीडियाचा जमाना असून करमणुकीची साधने देखील बदलली आहे. टीव्ही, सिरियल्स आदींची जागा आता फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामने घेतली आहे. आज देशभरात बहुतांश लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. लहान मुलांसापासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत याची आता क्रेझ आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही ज्याला करमणूक म्हणता त्यातून अनेक लोक करोडो रुपये कमावत आहे.

आज आपण मुनवर फारुकी याच्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. स्टँड अप कॉमेडी करण्यासाठी हा प्रसिद्ध आहे. पण तो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत. आज विविध प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून लॉक रुपये कमावत असून एकूण कोणत्या प्लॅटफॉर्म वरून तो किती कमावतो हे जाणून घेऊया

२८ जानेवारी १९९२ रोजी गुजरात राज्यातील जुनागढ शहरात जन्मलेल्या मुनवर फारुकी यांचा स्टँडअप कॉमेडियन, YouTuber म्हणून नावलौकिक आहे. त्यांच्या कॉमेडी सिन मुळे ते भारतभर प्रसिद्ध आहेत. लोकांना हसवण्याच्या त्याच्या टॅलेंटमुळे आज मुनावर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला आहे.

मुनवर फारुकी हे त्यांचे कॉमेडी व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकत असतात. लोकांना ते प्रचंड आवडतात. त्यांच्या चॅनेलचे जवळपास ४ मिलियन पेक्षा जास्त सब्सक्राइबर आहेत. ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून दरमहा सुमारे २ ते ३ लाख रुपये कमावतात.

तसेच मुनवर यांचे इन्स्टा वर देखील ७ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर आहेत. ते आपल्या अकाऊंटवरून एक स्पॉन्सर पोस्ट करण्यासाठी साधारण २ ते ३ लाख रुपये घेतात. महिन्याला ते यातून ५ ते ६ लाख रुपये कमावतात.

त्यांच्या या यूट्यूब चॅनेलवर ४ मिलियन पेक्षा अधिक अधिक Subscribers आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या जाहिराती करण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधतात. एका रिपोर्टनुसार, मुनवर फारुकी त्याच्या यूट्यूब चॅनलवर ब्रँडची जाहिरात करण्यासाठी ८ ते 10 लाख रुपये घेतात.

About Marathi E Batmya

Check Also

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *