जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो…, रितेश देशमुखची सूचक पोस्ट जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेत त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो

राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करुन आमरण उपोषणाला सुरूवात केली. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. सध्या सरकारी डॉक्टर तपासणी साठी आलेले असताना जरांगे पाटलांनी त्यांना पुन्हा पाठवले होते.

रविवारी त्यांची प्रकृती खालावली होती, तरीही जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्रातील अनेक मराठा बांधव त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, आता अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करुन मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत राज्य सरकारला विनंती केली आहे.

अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो शेअर करत लिहिले की, जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.

About Marathi E Batmya

Check Also

अभिनेता धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडीत दाखलः वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची सोशल मिडीयातून माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी, अभिनेते-राजकारणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *