‘सोन चिरैया’मध्ये सुशांत बनला डाकू अभिषेक चौबेचा नवा चित्रपट

मुंबईः प्रतिनिधी

‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आजवरचा प्रवास उलगडणारा सुशांतसिंह राजपूत आजवर कधीही न पाहिलेल्या गेटअपमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डेढ इश्किया’ आणि ‘उडता पंजाब’ फेम दिग्दर्शक अभिषेक चौबे सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. या चित्रपटाचं शीर्षक आहे ‘सोन चिरैया’. या चित्रपटात सुशांत डाकू बनल्याचं पाहायला मिळेल.

एखादी भूमिका सजीव करण्यासाठी त्या व्यक्तिरेखेच्या मूळापर्यंत जाऊन त्याचे सर्व गुणदोष आत्मसात करून ती रुपेरी पडद्यावर सादर करण्याच्या सवयीमुळे सुशांतने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिषेक चौबे यांच्या ‘सोन चिरैया’ या चित्रपटातील भूमिका याच वाटेवरील सुशांतचं पुढचं पाऊल आहे. ७० च्या दशकात चंबल खोऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या डाकूची कथा या चित्रपटात आहे. या चित्रपटातील डाकूच्या व्यक्तिरेखेत फिट बसण्यासाठी सुशांतने पुन्हा एकदा जीवाचं रान केल्याचं सूत्रांकडून समजतं. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुशांत हिच चौबे यांची पहिली चॅाइस होती. सुशांतलाही कथा आणि व्यक्तिरेखा आवडल्याने त्याने ‘सोन चिरैया’मधील आव्हान स्वीकारलं. या चित्रपटातील सुशांतचा लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. यावरून सुशांतने घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते.

About Editor

Check Also

सलीम खान यांना दाखल केले लीलावती रूग्णालयात आरोग्याबद्दलतची कोणातीही अधिकृत माहिती नाही

अभिनेता सलमान खानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *