स्वप्निलला पुत्ररत्नाचा लाभ

मुंबई : प्रतिनिधी

बालवयातच अभिनयाकडे वळल्यानंतर मोठेपणी ‘दुनियादारी’, ‘चेकमेट’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मितवा’ असे एका पेक्षा एक सुपरडुपर हिट मराठी सिनेमे देणाऱ्या सिनेचाहत्यांचा लाडका अभिनेता असलेल्या स्वप्निल जोशी बाप बनला आहे. स्वप्निलच्या घरी आज एका लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. २०११ मध्ये स्वप्निल लीना आराध्येसोबत विवाहबंधनात बांधला गेला होता. जवळजवळ सहा वर्ष राजा-राणीचा संसार सुखाने केल्यानंतर स्वप्निल-लीनाला पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद न मानणारा स्वप्निल खूप आनंदी आहे. जे होईल त्याचा आनंदाने स्वीकार करायचं असं दोघांनीही ठरवलं होतं असं सांगताना स्वप्निलच्या आनंद ओसंडून वाहत होता. आज स्वप्निलवर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याने या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार केला आहे. असेच सर्वांचे प्रेम कायम राहू दे अशी मनोकामना स्वप्निलने व्यक्त केली आहे.

About Editor

Check Also

सतलज चित्रपटानंतर आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता अन्न सुरक्षा व सार्वजनिक आरोग्यावर आधारीत द इंडिया स्टोरी: स्लो पॉयझन इन प्रोग्रेस कोर्टरूम ड्रामा

दलजीत दोसांझ अभिनीत ‘सतलज’ चित्रपटाभोवतीचा वाद शमण्याआधीच, आणखी एका चित्रपटासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पंजाबमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *