देशाच्या कोअर सेक्टरमधील उत्पादनात घट उद्योग मंत्रालयाने नुकतीच जाहिर केली आकडेवारी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने २७ मार्च रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ फेब्रुवारी २०२४ मध्ये ६.७% पर्यंत कमी झाली. विशेष म्हणजे पायभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांना देशाच्या कोअर सेक्टरचा भाग समजले जाते.

कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खत, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये जानेवारी २०२४ मध्ये ४.१% आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये ७.४% वाढ झाली.

तसेच, एप्रिल-फेब्रुवारी २०२२-२३ मधील ८.२% विरुद्ध या आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारीमध्ये या क्षेत्रांच्या उत्पादनातील वाढीचा दर ७.७% इतका कमी झाला.

देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP) आठ प्रमुख क्षेत्रे ४०.२७% योगदान देतात.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, प्रशासन एमएसीसीआयएच्या संकल्पनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे ३६ जिल्ह्यांत ३६ हजार ग्रामीण उद्योजक १.४४ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) ने राज्याच्या ग्रामीण आर्थिक लँडस्केपमध्ये बदल घडवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *