कोरोनावरील उपचारासाठी कोकणसह मराठवाडा, विदर्भात विशेष रुग्णालये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील कोकणसह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ३० शासकीय रुग्णालयांचे रूपांतर कोरोनासाठीच्या विशेष रुग्णालयात करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असून त्यासाठी २३०५ खाटा उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिध्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना  केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा आणि त्यातील अधिसूचीत रुग्णालयाचे नाव कंसात खाटांची संख्या:

ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१००), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण डोबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (१००), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००), नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (१००) (७०), अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (१००), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (५०), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), सातारा- सामान्य रुग्णालय (६०), सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी- सामान्य रुग्णालय  व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०), औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०). अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (१००),वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (१००), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (८०) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००) यासर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून २३०५ खाटा कोरोना बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.

About Editor

Check Also

हसन मुश्रीफ यांची माहिती, नवीन व श्रेणीवर्धित बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करणार

राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची उपलब्धता वाढविणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांमधून कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *