पालकमंत्री मलिक म्हणाले, परभणीकरांनो कोरोनामुक्त झाल्याबद्दल अभिनंदन पुढेही कोरोनामुक्तच राहिल असा विश्वास

परभणी: प्रतिनिधी
कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्‍या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानतानाच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. त्या रुग्णाच्या कुटुंबाला कॉरनटाईन करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जिल्हयात खबरदारी घेतली होती.
‘त्या’ रुग्णाचा पहिला आणि आज दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान याकामी मेहनत घेणार्‍या यंत्रणेचे विशेषतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी या सर्वांच्या कामाचे त्यांनी कौतुक करत यापुढेही परभणी जिल्हा कोरोनामुक्तच राहिल असा विश्वासही व्यक्त केला.

About Editor

Check Also

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागातील पाच हजार पदभरतीला गती १४०० डॉक्टरांची नियुक्ती आजच, १९०० सीएचओ पदेही लवकरच भरणार

राज्यातील आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पाच हजार नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *