मुख्यमंत्री शिंदे यांच्या चिरंजीवाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहिर

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून राज्यातील सत्तास्थानी असलेल्या शिवसेना शिंदे गटाला किती जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा सोडणार याबाबत प्रसारमाध्यमातून तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका मतदारसंघात जाहिर करण्यात आलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच मुलाच्या अर्थात डॉ श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार म्हणून जाहिर करण्यातही मुख्यमंत्री शिंदे यांना भाजपाने रोखले होते. अखेर आज भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहिर करत महायुतीचे उमेदवार म्हणून मताधिक्क्यांनी निवडूण येतील असे भाकितही केले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आव्हान देत वेगळी चूल मांडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत शिवसेना पक्षाची मान्यताही मिळाली. तसेच राज्यात सत्तेतील सर्वोच्च पद अर्थात मुख्यमंत्री पदही मिळाले. परंतु राज्यात लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजताच शिवसेना शिंदे गटाच्या निर्णय क्षमतेवर काहीशी भाजपाकडून गदा आणल्याची चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे कोणते विद्यमान खासदार निवडूण येथील कोणते पराभवाच्या छायेत आहेत याचा लेखाजोगा भाजपाने एका संस्थेच्या मार्फत काढून ठेवला. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी तथा कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराबाबत आक्षेप घेतला तेथील उमेदवार जाहिर करण्यास भाजपाकडून अटकाव करण्यात आला.

त्यातच शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्यातील विधानसभा आणि कल्याण मतदारसंघात अनेकदा आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच विद्यमान लोकसभा निवडणूकीसाठी कल्याणमधून वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी जाहिर केली. मात्र शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने यावेळी काहीही करून शिंदे समर्थकांना आणि संबधित उमेदवारांना धडा शिकविण्याचा चंग शिवसेना उबाठा गटाच्या अनेक छोठ्या-मोठ्या कार्यकर्त्यांनी बांधला असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार तथा मुख्यमंत्री सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहिर करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची चर्चाही राज्याच्या राजकारणा चांगलीच रंगली होती.

यापार्श्वभूमीवर अखेर भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत कोणताच आक्षेप नसल्याचे दाखवून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहिर करत डॉ श्रीकांत शिंदे हे महायुती उमेदवार म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघातून उभे राहतील आणि प्रचंड मताधिख्याने निवडून येतील असे जाहिर केले.

दरम्यान डोंबिवलीचे आमदार तथा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या आधीच काम सुरु केले आहे. त्यामुळे डॉ श्रीकांत शिंदेच कल्याणचे खासदार म्हणून पुन्हा निवडूण येथील असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

About Editor

Check Also

मुंबईत एका महिलेने ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या पोलिसांची व्हॅन अडवली सुरुवातीला एकटीने पोलिसांचे वाहन अडविले

पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी असलेली एक महिला, ताब्यात घेतलेल्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा मागचा दरवाजा उघडणारा एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *