सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार महसूल विभागाचा निर्णय, वर्षपूर्तीच्या तोंडावर खरेदी दारांची घाई

आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल वसुलीच्या इष्टांकाची पूर्तता करण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे.

महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक तसेच साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत राहतील. या कालावधीत कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिलेख व चुकविलेले मुद्रांक शुल्क वसुली इत्यादी कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सह जिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगरसह) कार्यालयेदेखील सुरू राहणार आहेत. संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे कार्यालयाचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

About Editor

Check Also

मुंबई महापालिकेने हे फटाके उडविण्यास घातली बंदी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत रस्ते व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंधात्मक बंदी घालण्याबाबत

दिवाळीला सुरुवात झाली असून मुंबईच्या रस्त्यावर आणि गल्लीबोळात विविध प्रकारचे फटाके उडविण्यास नागरिकांकडून, तरूणांकडून सुरुवात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *