उदय सामंत यांची माहिती, केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

मुंबईतील ऐतिहासिक केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य सचिन अहिर, प्रवीण दरेकर, अनिल परब, बच्चू कडू, प्रसाद लाड यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, केईएम रुग्णालयाला दीर्घ आणि गौरवशाली इतिहास लाभला असून देश-विदेशात या संस्थेची स्वतंत्र ओळख आहे. रुग्णालयाच्या नामांतरासंदर्भात विविध स्तरांवरून मते आणि निवेदने प्राप्त झाली आहेत. काहींनी नामांतराची मागणी केली आहे, तर काहींनी विद्यमान नाव कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे.

शेवटी बोलताना उदय सामंत म्हणाले की, या विषयातील सर्व कायदेशीर, शैक्षणिक, प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. हजारो विद्यार्थ्यांना या संस्थेच्या नावाने पदव्या आणि प्रमाणपत्रे देण्यात आलेली असल्याने तसेच विविध मान्यता आणि नोंदी या नावाशी संबंधित आहेत. त्यामुळे राज्य शासन कोणताही निर्णय घाईघाईने घेणार नसून सर्व संबंधित बाबींची शहानिशा करूनच योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले.

About Editor

Check Also

संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगतच्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी हालचाली गतिमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न, पहिल्या टप्प्यात ४ हजार नागरिकांचे पुनर्वसन होणार

गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला गती देण्यात येणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *