आशिष शेलार यांची माहिती, तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत शासन निर्णयही जारी

राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला  आहे.

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फडमालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊन, पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतील, तसेच तमाशा तक्रार निवारण समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष असणार असून, तमाशा फड मालक रघुवीर खेडकर, तमाशा फड मालक गोपाळ नाना शेषेराव, फड मालक संभाजी जाधव, कलाकार मंगलाताई बनसोडे, कलाकार अतांबर तात्या शिरढोणकर, अभ्यासक गणेश चंदनशिवे, अभ्यासक खंडुराज गायकवाड व सहसंचालक सदस्य म्हणून काम पाहतील असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, कलाकेंद्र तक्रार निवारण समितीमध्ये संचालक सांस्कृतिक कार्य हे अध्यक्ष असणार असून, कलाकेंद्र मालक बाळासाहेब काळे, कलाकेंद्र मालक अभिजित काळे, कलाकार रेश्मा परितेकर, कलाकार सुरेखा पुणेकर, कलाकार प्रमिला लोदगेकर, कलाकार संघटनेचे धोंडीराम जावळे, अभ्यासक प्रकाश खांडगे व सहसंचालक हे सदस्य म्हणून असतील. या समित्यांचा कार्यकाळ ३० दिवसांचा असून, आवश्यकतेनुसार या क्षेत्रातील इतर अभ्यासक, कलाकार आणि कलाकेंद्र चालक यांनाही पाचारण करण्यात येणार आहे.

या समित्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या शिफारसीनुसार शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

तमाशा आणि कलाकेंद्र यांच्यासंदर्भातील शासन निर्णय खालीलप्रमाणेः-

 

 

About Editor

Check Also

फैजान मिर्जा यांचे नितेश राणेंना सवाल, पंतप्रधानांवर टीका केली म्हणून देशद्रोह कसा? आधी संविधान वाचा, मग देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटा

अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे की मजबूत लोकशाहीसाठी टीका आणि टिप्पणी होणं गरजेचं आहे; त्यातूनच लोकशाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *