कार्यक्रम भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा अन अदानीची वीज गेली मोदी सरकारच्या पावला वर पाऊल ठेवत शिंदे सरकारची कामगिरी!:नड्डा

आगामी मुंबई महापालिका निवडणूका आणि मध्यावधी निवडणूकांची शक्यता गृहीत धरून सध्या सर्वच राजकिय पक्षांकडून तयारी सुरु केली. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असतानाही दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा याच्या ऐन कार्यक्रमात कांदीवलीतील अदानी पॉवरच्या वीज यंत्रणेकडून वीज गेली. त्यामुळे अखेर कार्यकर्त्यांच्या मोबाईल टॉर्चमध्ये कार्यक्रम पार पाडावा लागल्याची माहिती पुढे आली.
दरम्यान काही वेळानंतर अदानीकडून खंडीत झालेला वीज पुरवठा पुन्हा पुर्वरत सुरु झाला.

भाजपाचे राष्ट्रीच अध्यक्षाच्या दोन दिवसांच्या दो-यात मोदी सरकारच्या लाभार्थीचा मेळावासहीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटकमधील निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणूकांची तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून मुंबईत बूथ स्तरावर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नड्डा याच्याकडून रात्री लोकसभा निवडणूक समोर ठेवून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

नड्डा यानी भाजपा पदाधिकारी आणि नेत्यांसमोर मोदी सरकारच्या कोविडच्या काळातील कामगिरीचे कौतुक केले. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार देखील त्यांच्याप्रमाणेच राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी काम करत आहे असे ते म्हणाले.
तसेच आगामी मुंबई महापालिकात निवडणूकीत भाजपाच्या जागा सर्वाधिक येऊन भाजपाचाच महापौर होईल असा विश्वास व्यक्त केला.

About Editor

Check Also

उदय भानू चिब यांची मागणी, IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्रा. सुर्यनारायण दुल्लांना तत्काळ अटक करा राहुल गांधी यांचा साहिलच्या पालकांशी फोनवरून संवाद, काँग्रेस साहिलच्या कुटुंबियांसोबत, साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल.

आयआयटी IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याला संस्थेतील प्राध्यापकांनी जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच आत्महत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *