अमरावतीतील उमेदवारीवरून आनंदराज आंबेडकर यांची माघार तर वंचितचा खुलासा

महाराष्ट्रासह देशातील लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरु झाली आहे. त्यातच अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्याबाजूला प्रकाश आंबेडकर यांचे बंधू तथा रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीतून आपला उमेदवारी अर्ज नुकताच सादर केला. मात्र या दोन्ही भावांच्या पक्षात संवाद साधण्यात चूकभूल झाल्याने अखेर आनंदराज आंबेडकर यांनी आपली उमेदवारी मागे घेत वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहिर केला. त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीला खुलासा करण्याची पाळी आली.

अमरावती लोकसभा मतदारसंघात संभावित भाजपा उमेदवार नवनीत राणा या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे गृहीत धरून रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा जाहिर करण्यात येईल अशी अटकळ धरली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीने अमरावतीत दुसराच उमेदवार जाहिर करत त्यास आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. मात्र शेवटच्या दिवसाचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच आपण निवडणूकीतून माघार घेत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहिर करत वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहिर केला. मात्र ऐन निवडणूकीच्या धामधुमित आंबेडकर यांच्या घरातच वाद असल्याचा चुकिचा संदेश राज्यातील जनतेत जाईल अशी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे अखेर वंचितने तातडीने जाहिर करण्यात आलेल्या उमेदवाराला अर्ज भरू नये असा संदेश देत आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहिर करण्यात आला.

यासंदर्भात वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर यासंदर्भातील अधिकृत पत्र जाहिर करत आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी मागे घेऊ नये अशी विनंती करत त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचाही खुलासा केला.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांच्या मागणीला यश, एमएसईडीसीएलने जाहीर केली अभय योजना अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रईस शेख यांनी सादर केली होती लक्षवेधी

भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून ऊर्जा मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *