भाजपा नेते राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश कुस्तीगीर संघटनेच्या पैलवानांनी हाती बांधले घड्याळ...

भाजपा नेते तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला

आज प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान अक्षय हिरगुडे, महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय गरुड, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज वहाग, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान सागर गरुड, महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश भांडे, मुंबई केसरी पैलवान आबा काळे, पुणे महापौर केसरी पैलवान सोनबा काळे आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

तर सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिकेतील विविध पक्षातील नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षा अ‍ॅड. वसुधा कुंभार, सांगली विधानसभा क्षेत्र शहराध्यक्षा रुकसाना कादरी, मिरजच्या नगरसेविका स्वातीताई पारधी, नगरसेविका राणी मोरे, सां.मि.कु. महानगरपालिकेचे माजी सभापती पुष्पा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष देवळेकर, माजी नगरसेविका सुरेखा कांबळे, कुपवाड विधानसभा क्षेत्र शहराध्यक्ष प्रवीण बाबर, सांगली शहर युवक उपाध्यक्ष दयानंद टोवळे, संघटक विधानसभा क्षेत्र प्रसाद पाटील आदींचा समावेश आहे.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची केशव सृष्टी येथे सहल नको केशवसृष्टीमध्ये विद्यार्थ्यांची सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी (उत्तन- भाईंदर ) येथील प्रस्तावित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *