रिदा रशीद यांचा सवाल, आ.आव्हाडांच्या कृत्याबद्दल खा.सुप्रियाताई, चाकणकर गप्प का?

राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनावेळी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा.सुप्रियाताई सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

रशीद म्हणाल्या की, ठाण्यात रविवारी झालेल्या फ्लायओव्हरच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रण असल्यामुळे मी तेथे गेले होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी बाजूला थांबले होते. मुख्यमंत्री वाहनातून निघाले असताना मी त्यांना भेटण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी मला सरळ-सरळ बाजूच्या पुरुषांच्या गर्दीत ढकलून दिले. ढकलून देत असताना, ‘तू इथे काय करते आहेस,’ असे ते म्हणाले. या घटनेबाबत आपण पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाला आहे. या घटनेची ध्वनिचित्रफित सर्वत्र प्रसारित झाली असून त्यात आव्हाड यांनी मला कोणत्या पद्धतीने ढकलले हे स्पष्टपणे दिसते आहे.

राष्ट्रवादीच्या खा.सुप्रियाताई सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराच्या या कृत्याबाबत अजूनही चकार शब्द उच्चारलेला नाही. माझ्या तक्रारीबाबत पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी, एवढेच माझे म्हणणे आहे, असेही रशीद यांनी नमूद केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *