बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

बदलापूर प्रकरणात राज्य सरकारने केलेली अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. संबंधित शाळेचे संचालक मंडळ भारतीय जनता पक्षाशी व आरएसएसशी संबंधित आहे. त्यामुळेच हे प्रकरण हाताळताना राजकीय हस्तक्षेप होऊ शकेल अशी रास्त भिती लोकांना वाटत आहे. भाजपाचे लोकसभेचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून झालेली नियुक्ती साशंकता निर्माण करणारी आहे असल्याचे मतही वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केली.

रेखा ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना संतापजनक आहे. शाळेच्या संचालक मंडळाची प्रकरण दडपून टाकण्याची भूमिका त्याहीपेक्षा संतापजनक आहे आणि पोलीसांनी केस नोंदवून घेण्यात केलेली दिरंगाई अक्षम्य आहे. या परिस्थितीत बालिकांना न्याय व सुरक्षितता मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणां विरोधात जनक्षोभ उफाळून आला व २० ऑगस्ट रोजी लोक रस्त्यावर येऊन आंदोलन उभे राहिले. लोकांचा राग शाळेच्या चालकांवर आहे त्याचप्रमाणे पोलिस खात्यावरही आहे. वंचित बहुजन आघाडी या घृणास्पद घटनेतील गुन्हेगार शिंदे, घटना झाकून ठेवणारे शाळेचे संचालक मंडळ व पोलीस खाते या सर्वांचा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना रेखा ठाकूर म्हणाल्या की, पीडित बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व न्याय प्रक्रिया ही पारदर्शक व कोणत्याही दबाव व हस्तक्षेपा पासून मुक्त राहिल अशी ग्वाही जनतेला मिळाली पाहीजे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *