भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी

छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका नाहीतर महागात पडेल असा सज्जड धमकीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका दूरचित्रवाणीवरून दिली.

देशातील पाच राज्यांमध्ये विशेषत: पश्चिम बंगालमधील निवडणूकीच्या निकालावर एका दूरचित्रवाहिनीवर चर्चा सुरु होती. त्यावेळी भुजबळांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांना मत विचारले असता पाटील यांनी थेट भुजबळ यांना थेट धमकीच दिली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकालावर बोलताना मंत्री भुजबळ‌ म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी झाशीची राणी जशा म्हणाल्या मै झाशी नही दुगी तसे ममता बॅनर्जी यांनी मै मेरा बंगाल नही दुंगी असे म्हणत बंगालचा गड राखला. भाजपाचे अनेक नेते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह हे तेथील प्रचाराला गेले. मात्र त्यांना विजय मिळविता आला नसल्याचे मत व्यक्त केले.

या प्रतिक्रियेवर चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी थेट भुजबळ यांना धमकी देत पाटील म्हणाले, भुजबळांची जेलवारी झालेली आहे. सध्या जामीनावर बाहेर आहेत. त्यांनी काय ते इथल्या परिस्थितीवर बोलावे केंद्रातील नेत्यांवर बोलू नये अन्यथा महागात पडेल.

यावर भुजबळांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

About Editor

Check Also

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *