काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नांदेडच्या बसस्थानकाला भेट महिला प्रवाशांशी साधला संवाद महागाई आणि बेरोजगारी प्रश्न महिलांकडून उपस्थित

जनतेत मिसळणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे या गोष्टी आताच्या राजकिय वर्तुळात दुरापास्त झाले आहे. त्यातच १२ वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना तर आता जनतेत मिसळून त्यांच्या व्यथा, त्यांचा त्रास जाणून घेण्याचे तर आता विसरूनच गेले असताना काँग्रेस नेते तर राहुल गांधी हे मात्र संधी मिळेल तेव्हा शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक असो, लहान मुलं असो किंवा शालेय विद्यार्थी, तरूण- तरूणी असो सर्व वयोगटातील जनतेला भेटण्याची संधी आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी सोडत नाही. राज्यात सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज अचानक नांदेड येथील एसटी डेपोला भेट देत तेथील महिलांसह अन्य प्रवाशांशी संवाद झाला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नांदेडच्या एसटी डेपो मध्ये प्रवेश करताच तेथील प्रवाशांनी एकच गर्दी केली. तसेच यावेळी एसटी डेपोतून प्रवेश करणाऱ्या महिला नागरिक यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी यांनी महिला प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत चर्चा केली.

या महिलांनी राहुल गांधी यांना भेडसावऱ्या प्रश्नी बोलतं केलं असता महिला प्रवाशांनी म्हणाल्या की, महागाई आणि वाढत्या बेरोजगारीच्या समस्येच्या प्रश्नी आपले म्हणणे मांडले.

यावेळी राहुल गांधी यांनी महिलांच्या बँक खात्यात महालक्ष्मी योजनेंतर्गत महिन्याला ३ हजार रूपये जमा होतील असे सांगत राज्यात महिलांना मोफत प्रवास करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

नांदेड मधील राहुल गांधी यांच्या अचानक एसटी डेपोला भेट देत तेथील प्रवाशांशी संपर्क साधत संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे नांदेडमधील भाजपाच्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

 

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड : काँग्रेस कार्यालयावर भाजपाचा मोर्चा म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची भाजपाच्या टिनपाट अमित साटमची लायकी नाही – खा. वर्षा गायकवाड

लाखो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला त्याचे उत्तर द्या, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना साथ देणाऱ्या भाजपाने काँग्रेसला अक्कल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *