सैनिक कल्याण विभागाकडून कंत्राटी तत्वावर या पदासाठी मागविले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून आवाहन

सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी १५ जानेवारी, २०२५ रोजीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रां.प्र.जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक, आजी सैनिक यांची पत्नी असावी (युध्द विधवेस/विधवेस प्राधान्य). शिक्षण दहावी उत्तीर्ण असावे तसेच एम.एस.सी.आय.टी. पास व टायपिंग येणा-यास प्राधान्य. वयोमर्यादा -४५ वर्षाच्या आत. मानधन दरमहा २४ हजार, ४७७ इतके आहे.

अर्जासोबत युध्द विधवा,विधवा, माजी, आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवणेत आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर, द्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, डायमंड आवा हॉस्टेलच्या मागे, हंस भुंग्रा मार्ग, सांताक्रुझ (पु.), मुंबई-४०००५५. दूरध्वनी : ०२२-३५०८३७१७ येथे संपर्क साधावा.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी  महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *