केंद्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहिर

हंसराज अहीर यांनी आज केंद्रीय मागासवर्ग अर्थात ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले.
आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

‘देशभरात इतर मागासवर्गात जवळपास अडीच हजार जाती आहेत. पोट जातींसह ५ हजार ५०० जाती इतर मागासवर्गात मोडतात. देशातील बहुतेक सर्वच राज्यांमध्ये मोठ्या संख्येने इतर मागासवर्ग जातीत मोडणारे लोक आहेत. या सर्व बांधवांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थ‍िक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकासासाठी मागासवर्ग आयोग कार्यरत असून तो अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी, प्रयत्न करणार असल्याचे अहीर यावेळी म्हणाले.

शासनाच्या योजनांचा लाभ देशातील सर्वच स्तरातील मागासवर्गापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे या देशातील विषमता, असमानता संपविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भारतीय संविधानात हे अंर्तभूत आहे. त्याचप्रमाणे इतर मागास जातीतील सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्या, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *