गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेत, सुप्रिया सुळेचा हल्लाबोल गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम मावळत्या मुख्यमंत्र्यांकडून

कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यास मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून उघडकीस आणली. तसेच श्रीकांत पांगारकर यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी जालना विधानसभेच्या प्रमुख पदाची जबाबदारीही सोपविली. पत्रकार गौरी लंकेश हत्येतील आरोपी श्रीकांत पांगारकर यास राजकारणात प्रवेश दिल्याने एक वेगळाच संदेश राज्यातील जनतेत गेला असून या पक्ष प्रवेशावरून मुख्यमंत्री शिंदे यांना विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी एका सोशल मिडीयावर एक फोटो प्रसिद्ध करत म्हणाल्या की, हे अतिशय धक्कादायक असून गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम खुद्द मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचा पक्ष आघाडीवर आहे. राज्यात कायद्याचे तीन-तेरा वाजले, याच्या काही कारणांपैकी एक प्रमुख कारण हे एक आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुरोगामी विचारांच्या प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करून करून घेतले असून या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे. म्हणूनच खोके सरकारला नाकारणारे आणि कायद्याचा आब आणि आदर करणारे शासन हवे आहे असेही यावेळी सांगितले.

ईडीच्या पिढेतून सुटका करून घेण्यासाठी शिवसेना उबाठा गटाला सोडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेलेल्या जालन्याचे माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी श्रीकांत पांगारकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला. तसेच या पक्ष प्रवेशावेळी स्वतः जातीने उपस्थित राहिले. यावेळी बोलताना अर्जून खोतकर म्हणाले की, श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत. ते पक्षात परत आले आहेत. त्यांची जालना विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर श्रीकांत पांगारकर यांना उमेदवारी देणार का असा सवाल केला असता अर्जून खोतकर यांनी सांगितले की, श्रीकांत पांगारकर हे स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण सध्या महायुतीचे जागा वाटप झालेले नसल्याने आत्ताच सांगता येत नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे या व्यक्तीस अटक केली होती. तसेच पोलिस तपासात गौरी लंकेश यांच्या हत्या महाराष्ट्रातील व्यक्तीने सुपारी दिल्याने केल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर पोलिसांनी २०१८ मध्ये श्रीकांत पांगारकर यांना अटक केली. तेव्हा पासून श्रीकांत पांगारकर हे तुरुंगात होते. मात्र श्रीकांत पांगारकर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ४ सप्टेंबर २०२४ पासून जामीनावर बाहेर आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *