प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य काँग्रेस मुख्यालय टिळक भवनात सोमवार व मंगळवारी बैठकांचे सत्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य देत आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक सोमवारी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता तर मंगळवारी २५ फेब्रुवारी दुपारी १.३० वा. रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे तसेच पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी-यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन यांच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप व कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड गणेश पाटील यांनी दिली आहे.

जवळपास काँग्रे पक्षाच्या स्थापनेला १०० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र सतत सत्तेत राहिल्याने काँग्रेसच्या टीकाकारांकडून काँग्रेसच्या संघटनेत आलेल्या मरगळीवर सातत्याने टीका करण्यात आली. तसेच काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीकडे फारसे लक्ष्य दिले नाही. यापार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील जिल्ह्याध्यक्षांची बैठक आयोजित केली आहे. तसेच या बैठकीत संघटनात्मक आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाबाजूला भाजपाने त्यांच्या मतदार आणि पक्षाचे नाते मजबूत करण्यासाठी सातत्याने संघटनात्मक बांधणीला महत्व दिले आहे. तसेच भाजपाच्या संदस्य संख्या वाढीवरही भर दिला आहे. मात्र दुसऱ्याबाजूला काँग्रेसकडून पक्षाची सदस्यसंख्या वाढण्यावर भर दिला जातो. परंतु सदस्य झालेल्या मतदाराला संघटत्माक पातळीवर जोडण्याचे काम अपूरे राहते. त्यामुळे काँग्रेसच्या मतदार आणि संघटनेतील कार्यकर्त्यांची सातत्याने घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोदयी संघटनेत काम केलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर काँग्रेसची संघटनात्मक बांधणी हे एक आव्हान ठरणार आहे.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *