तो व्हिडिओ ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या; अमित शहाजी, शिंदे गटाच्या आमदारांना… मविआच्या आमदारांना धमकावणारा शिंदे गटाचा व्हिडीओ ट्वीटरवर केला शेअर

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरामध्ये खुलेआम महाविकास आघाडीच्या आमदारांच्याबाबत हिंसक वक्तव्य करुन त्यांना धमकावण्याचे काम करत असल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ही घटना निदर्शनास आणून दिली.

भाजपासोबत युती करुन सरकार चालवणार्‍या लोकांचे हे वर्तन आणि प्रतिक्रियांवर तुम्ही कारवाई करा आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना शिंदे गटाच्या लोकांकडून असलेला धोका लक्षात घेता झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी विनंती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन केली.

About Editor

Check Also

प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणा करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *