निलंश लंके यांची स्पष्टोक्ती, राष्ट्रवादीच्या खासदारांचे ऑपरेशन कधीही होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

पक्ष पुन्हा एकदा नवीन जोमात उभा करण्याकरिता पक्ष संघटनेत लवकरच बदल करण्यात येणार असून त्यानंतर राज्यभर दौरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून जिल्हास्तरावर काही बदल करण्यात येणार आहेत. नव्या जोमाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निर्णय घेतले जातील. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन करण्यात येईल,असेही स्पष्ट केले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी एकत्रित आंदोलन आणि संयुक्त दौरे करावेत, अशी सूचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर सातत्याने एकत्रितपणे जनतेसमोर जाणे गरजेचे आहे, असेहीही यावेळी सांगितले.

संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, सत्तेची धुंदी चढल्यानंतर काही जण कोणालाही न जुमानणारी भाषा वापरतात. पत्रकारांनाही दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संजय राऊत बॉम्ब किंवा मारून टाकण्याची भाषा करत नाहीत. मात्र सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडूनही अशा प्रकारची वक्तव्ये होत आहेत, असे सांगितले.

आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांनी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्यावर दबाव आल्यामुळे बैठक झाली नसावी, असेही  म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की,राम मंदिराच्या नावावर राजकारण होत असल्याचा आरोप करत त्यांनी मंदिरासाठी जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा हिशोब सार्वजनिक करावा,अशी मागणी यावेळी केली .

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, सरकार पक्ष फोडणे आणि आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न असताना शहरीकरणाला दिलेल्या परवानग्यांमुळे भविष्यात संकट अधिक वाढेल, असेही म्हणाले.

राष्ट्रवादीच्या खासदारांचं ऑपेरेशन कधीही होणार नाही- खासदार निलेश लंके

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्ववात आम्ही कामं करतो. आमचे चालक शरद पवार साहेब आहेत. ते आम्हाला सुरक्षित ठेवतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांचं ऑपेरेशन कधीही होणार नाही, असे खासदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितले आहे.

खासदार निलेश लंके बोलताना म्हणाले की, खासदारांच्या चुका ज्या घडल्या त्यामुळे ते जनते समोर येत नाहीत. आम्ही कायम बोलतो, शरद पवार साहेबांबरोबर आम्ही कायम असणार आहोत, असेही सांगितले.

खासदार निलेश लंके म्हणाले की,संसदेत कामकाज करत असताना, आम्ही सगळे एकत्र असतो, विकासकामांसाठी कोण सत्तेत आणि विरोधात आहे त्याचा विचार केला जातो पण विकासनिधी मिळत नसेल तरी,मी काम करणारा कार्यकर्ता आहे, निधी खर्च करण्यापेक्षा विकासकामे प्रत्यक्ष पूर्ण करण्यावर माझा भर असतो, असेही स्पष्ट केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *