राजकारण

योगेश कदम यांची माहिती, पोलीस कोठडीतील आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ससून रूग्णालयात पोलिस चौकीची स्थापना

पाचगणी पोलीस स्टेशन येथे पोक्सो अन्वये दाखल गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच कर्तव्यात केलेल्या कसुरीबाबत त्यांच्यावर खातेनिहाय विभागीय चौकशीची कारवाई करण्यात आलेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत ससून रुग्णालय पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली असल्याचे गृह …

Read More »

काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी उद्यापासून चिपळूणमध्ये ३ दिवसीय निवासी शिबिर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह ज्येष्ठ नेते व विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी हे निवासी प्रशिक्षण शिबिर आहे. चिपळूणमधील या शिबिराला काँग्रेस …

Read More »

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती, अल्पसंख्यांक प्रशिक्षण संस्था लवकरच कार्यान्वित होणार समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था ( मार्टी ) आपले नियमित कामकाज लवकरच सुरू करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक विकास विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांनी तारांकित प्रश्नाला गुरुवारी विधानसभेत दिली. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (मार्टी ) कामकाज संस्था स्थापन होऊन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, जर खरा इतिहास शिकवला असता तर ही वेळच आली नसती… हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरून केली टीका

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतान यांचा लावण्यात आलेला फोटो काढल्यावरून म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामापासून प्रेरणा घेत टीपू सुलतान यांनीही इंग्रजाच्या विरोधात काम केले असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून टीपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजासोबत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, अभिभाषणात जुन्याच मुद्याची घासून पूसून उजळणी राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक

राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक आहे. अभिभाषणात  जुन्याच  मुद्द्यांची घासून-पुसून  उजळणी केली असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी  जळजळीत  टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते  विजय वडेट्टीवार यांनी  बुधवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. …

Read More »

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ३ टक्के वाढ वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे विधानसभेत निवेदन

राज्य शासकीय  व इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ५५ टक्क्यावरून ५८ टक्के अशी ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे निवेदन वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केले. राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार असून जुलै २०२५ …

Read More »

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधानभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य कराराच्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ब्रिस्टॉल …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली ग्वाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतक-यांचा समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेपासून राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तरी या …

Read More »

डॉ पंकज भोयर यांची ग्वाही, किडनी घोटाळ्यातील आरोपींना मोक्का लावणार बेकायदेशीर सावकारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्यास भाग पाडल्याच्या खळबळजनक प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. या गंभीर घटनेनंतर, राज्य सरकारने बेकायदेशीर सावकारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे आणि आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू करण्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या …

Read More »